बारवांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:14+5:302021-02-05T08:03:14+5:30

वाहतुकीची कोंडी अंबड : शहरातून जाणाऱ्या जालना-वडीगोद्री महामार्गाचे काम सुरू आहे, परंतु अनेक वाहन चालक रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेला ...

The discovery of twelve | बारवांचा शोध

बारवांचा शोध

वाहतुकीची कोंडी

अंबड : शहरातून जाणाऱ्या जालना-वडीगोद्री महामार्गाचे काम सुरू आहे, परंतु अनेक वाहन चालक रहदारी असलेल्या रस्त्याच्या कडेला वाहने चालवित आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.

धुळीमुळे नागरिक त्रस्त

जालना : शहरातील अंबड चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

शहागडमध्ये हुरडा पार्ट्या

अंबड : तालुक्यातील शहागड व परिसरात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे. ज्वारीचे पीक हुरड्यात असल्याने सध्या या भागात हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. त्यामुळे शेतशिवारात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

रस्त्याची दुरवस्था

पारडगाव : पारडगाव ते कंडारी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढली असून, बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीसह झुडपे तोडण्याची मागणी होत आहे.

Web Title: The discovery of twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.