शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

दिगंबरा... दिगंबराच्या... जयघोषात जन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:22 IST

दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दिगंबरा... दिगंबरा ... श्रीपाद वल्लभ... दिगंबरा, स्वामी समर्थ महाराजांचा जयघोष, भजगोविंद्म भजगोपालच्या निनादात जिल्हाभरात दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त जुना जालना भागातील गणपती गल्लीस्थितीत दत्त मंदिरातून दत्त महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली.जुना जालना भागातील नरिमाननगर, तुळजा भवानी नगर, तसेच भालेनगरी येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये परंपरागत पध्दतीने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नरिमान नगरमध्ये सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सवाचा पाळणा महिलांनी सामूहिक पध्दतीने सादर केला. यावेळी महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाभरातील दत्त मंदिरांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाची सांगता गुरुवारी महाप्रसादाने होणार आहे.गणपती गल्ली येथील दत्त मंदिरातून सायंकाळी पालखी काढण्यात आली. यावेळी सुधाकर लोखंडे, अ‍ॅड. विष्णू किनगावकर, किरण टाकळकर, प्रकाश वडगावकर, अनिल लोखंडे, प्रदीप जनगाडे, धनंजय याडकीकर, रवि कुलकर्णी, विनायक महाराज फुलंब्रीकर आदींची उपस्थिती होती.जालना तालुक्यात रोहनवाडीजवळील भोलेश्वर बरडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जन्मोत्सव परंपरागत उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दत्त जन्मोत्सव परंपरागत पध्दतीने साजरा करण्यात आला. हे सर्व कार्यक्रम बरडी संस्थानचे मठाधिपती स्वामी सच्चिदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनात झाले.

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरReligious programmeधार्मिक कार्यक्रम