शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

धामणा धरणाच्या सांडव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:34 IST

शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन (जि.जालना) : तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या सांडव्याला पडलेल्या चिरांमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. या गळतीमुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी धरणाच्या खालील शेलूद, लेहा, पारध खु, पारध बु, या गावांसह बुलडाणा जिल्ह्यातील म्हसला या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.भोकरदन तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारीही पावसाने दमदार हजेरी लावली. पाण्याची आवक वाढल्याने धामणा धरणात ८५ टक्क्याहून अधिक पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्रीपासून सांडव्याच्या खालच्या बाजूस ५ ते ६ चिरे पडले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. त्यामुळे धरण फुटण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आणि नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, तहसीलदार संतोष गोरड, कनिष्ठ अभियंता एस.जी.राठोड आदींनी धामणा धरण परिसराची पाहणी केली. पाहणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना गळती रोखण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसfloodपूरGovernmentसरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प