शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

राजूरनगरीत भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:39 AM

श्री जन्मोत्सवानिमित्ताने राजूर नगरी भक्तांच्या मांदियाळीने दुमदुमून गेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : श्री जन्मोत्सवानिमित्ताने राजूर नगरी भक्तांच्या मांदियाळीने दुमदुमून गेली आहे. रामकृष्ण हरी, ज्ञानदेव तुकारामाच्या गजर अखंडित सुरू असून श्री जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे राजूर परिसरात चैतन्यमय वातावरण पसरले आहे.श्रीगणेश जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, हभप जगन्नाथ महाराज यांच्या वाणीतून राम कथेचे वाचन सुरू आहे. यावर्षी हरिनाम सोहळ्याने ५१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. रविवारपासून दिवस-रात्र भरगच्च धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे. यात हभप सोपान महाराज शास्त्री, संजय महाराज कावळे, निवृत्ती महाराज इंदोरीकर, गोविंंद महाराज चौधरी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, विश्वशांती, अंधश्रध्दा आदी विषयावर समाजप्रबोधन केले.सोहळा यशस्वीतेसाठी संयोजक विष्णू महाराज सास्ते, माजी सरपंच शिवाजी पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, भीकनराव पुंगळे, विष्णू राज्यकर, कैलास पुंगळे, देवराव डवले, गणेश साबळे, श्रीमंता पुंगळे, श्रीरामपंच पुंगळे, नारायण पुंगळे, कृष्णा जाधव, गजानन जामदार, अप्पासाहेब पुंगळे, भारतअप्पा कोमटे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते रविवारी सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा होणार आहे. दुपारी १२ वाजता राजूरेश्वराचा जन्मोत्सव उत्साहात साजरा केला जाणार आहे. यावेळी श्रीस वस्त्रालंकार चढविण्यात येणार आहे. तसेच रात्री ९ वाजता मंदिरातून श्रीची पालखी मिरवणुक काढण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी जन्म सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानच्या अध्यक्षा तथा तहसीलदार योगिता कोल्हे, व्यवस्थापक गणेशराव साबळे आदींनी केले आहे.