राजूर गणपतीस भाविकांकडून पावणे दहा लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:26 IST2021-01-04T04:26:16+5:302021-01-04T04:26:16+5:30
प्राप्त देणगीमध्ये प्रवेश देणगी दोन लाख एक हजार ४०० रुपये, अभिषेक देणगी ४४ हजार ६४२ रुपये, बांधकाम देणगी १६ ...

राजूर गणपतीस भाविकांकडून पावणे दहा लाखांची देणगी
प्राप्त देणगीमध्ये प्रवेश देणगी दोन लाख एक हजार ४०० रुपये, अभिषेक देणगी ४४ हजार ६४२ रुपये, बांधकाम देणगी १६ हजार ३१३ रुपये, सुबक मार्बल आसन देणगी ५९ हजार ६१९ रुपये, वाहनतळ देणगी १४ हजार ५८० रुपये, श्री दानपेटी तीन लाख ४३ हजार ७४ रुपये, बांधकाम देणगी दोन लाख ९४ हजार ७५ रुपये, असे एकूण नऊ लाख ७३ हजार ७९३ रुपये देणगी मिळाली. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी राजुरेश्वर मंदिरात देणगी पेट्या उघडल्यानंतर वरीलप्रमाणे देणगी मिळाली. यावेळी व्यवस्थापक गणेश साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, श्रीराम पुंगळे, तलाठी ए. व्ही. कड, एस. पी. कदम, अंकुश ठोकळ, एस. एस. जकाते, एस. एस. लाड, मनोज साबळे, रावसाहेब खरात, भीमराव बारोकर, ए. एस. सोनवणे, कृष्णा कदम, के. एस. माने, छगन हाळदे, अशोक कापरे, बाळा तांगडे, मदन दरक यांच्यासह भाविक, संस्थान व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.