नगराध्यक्षपदी देशमुख बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:23 IST2018-05-20T01:23:32+5:302018-05-20T01:23:32+5:30
घनसावंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता देशमुख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचा नावाची औपचारिक घोषणाच बाकी आहे.

नगराध्यक्षपदी देशमुख बिनविरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता देशमुख यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांचा नावाची औपचारिक घोषणाच बाकी आहे.
या नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बारा तर अन्य पाच असे एकूण १७ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये यशोदा राठोड, अंजना कथळे, कविता पवार, प्राजक्ता देशमुख, सय्यद सलीमा बी, चंद्रकला चव्हाण, योजना देशमुख, लता हिवाळे, राधेशाम घाईत बाबासाहेब सोरमारे, शिवसेनेच्या मीरा देशमुख, भाजपाचे गणेश हिवाळे,
फैय्याज पठाण, अपक्ष विलास गायकवाड व एमआयएमच्या शाहिना बेगम नदीरखान पठाण असे पक्षीय बलाबल आहे. २३ मे रोजी या निकालाची घोषणा होणार आहे.