काळ्या आईची ओटी भरण्यासाठी २७ कोटींच्या ठेवी मोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:16+5:302021-05-20T04:32:16+5:30

आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच पीककर्ज वाटपाची गती जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता अन्य कुठेच दिसत नाही. त्यामुळे ...

Deposits of Rs 27 crore were broken to pay the black mother's OT | काळ्या आईची ओटी भरण्यासाठी २७ कोटींच्या ठेवी मोडल्या

काळ्या आईची ओटी भरण्यासाठी २७ कोटींच्या ठेवी मोडल्या

आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशातच पीककर्ज वाटपाची गती जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता अन्य कुठेच दिसत नाही. त्यामुळे बँक देईल् आणि नंतर आपण पेरणी करू, अशी वाट पाहण्याची स्थिती आज राहिली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख अससेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चित्र पाहता, अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा घाम गाळून ठेवलेल्या ठेवी मोडल्या आहेत. या ठेवी सहसा शेतकरी आपल्या मुलीच्या विवाहासाठी राखून ठेवत असतो. परंतु आज खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी गप्प बसू शकत नाही. त्यामुळेच गेल्या महिन्याभरात मध्यवर्ती बँकेतील अनेक खातेदारांनी त्यांच्या २८ कोटी रुपयांच्या हक्काच्या ठेवी माेडल्याचे दिसून आले.

चौकट

कर्जवाटपाची गती वाढवा

जिल्हा मध्यवर्ती बँक सोडल्यास जिल्ह्यातील अन्य बँका म्हणजेच राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँका या शेतकऱ्यांना वाऱ्यावर साेडत असल्याने आपले जुनेच अनुभव आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीच लक्ष देऊन आतापासून या बँकांना कर्ज वाटपाबाबत कडक सूचना देऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. याबाबत जर या बँकांनी चालढकल केली, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार असून, जी बँक उद्दिष्ट पूर्ण करणार नाही, त्या बँकेसमसोर काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात येईल्.

भीमराव डोंगरे, माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, जालना

जि. म. बँकेचे ४२ कोटींचे वाटप

जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेस यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात मिळून १२५ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या बँकेने पूर्वीपासून पीककर्जाचे नियोजन केले असून, आतापर्यंत २२ हजार २३९ शेतकऱ्यांना ४२ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. यासाठी बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड तसेच उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल तसेच सर्व संचालकांनी पुढाकार घेतल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी दिली.

Web Title: Deposits of Rs 27 crore were broken to pay the black mother's OT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.