निकृष्ट मोबाइल अंगणवाडी सेविकांकडून कार्यालयात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST2021-08-24T04:33:45+5:302021-08-24T04:33:45+5:30

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीचे कामकाज ऑनलाइनप्रणालीमध्ये करण्यासाठी शासनाने मोबाइलचा पुरवठा केला होता; परंतु संबंधित मोबाइलमध्ये अत्यंत कमी डेटा संकलन ...

Deposited to the office by inferior mobile Anganwadi workers | निकृष्ट मोबाइल अंगणवाडी सेविकांकडून कार्यालयात जमा

निकृष्ट मोबाइल अंगणवाडी सेविकांकडून कार्यालयात जमा

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीचे कामकाज ऑनलाइनप्रणालीमध्ये करण्यासाठी शासनाने मोबाइलचा पुरवठा केला होता; परंतु संबंधित मोबाइलमध्ये अत्यंत कमी डेटा संकलन असल्यामुळे वारंवार बंद पडत होते. केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर ॲप्सअंतर्गत अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज करणे सक्तीचे केले होते. मात्र, कमी रॅम असल्यामुळे हे ॲप्स डाउनलोड होत नाहीत. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना आपल्या खाजगी वैयक्तिक मोबाइलचा वापर करावा लागत होता. ट्रॅकर ॲप्समध्ये लाभार्थी यादी, झीरो ते सहा वर्षे बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची नोंद, दैनंदिन हजेरी भरणे, सर्व लाभार्थी, घरपोच आहार नोंदणी आणि वाटप, संपूर्ण लाभार्थ्यांची वजन-उंची दरमहा घेऊन ॲपवर नोंदविणे आदी कामे संबंधित मोबाइलमधून करावी लागत होती. निकृष्ट दर्जाच्या मोबाइलमुळे कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी हे मोबाइल परत केले.

यावेळी अंगणवाडी संघटनेच्या तालुकाध्यक्ष नंदा देशमुख, सचिव लक्ष्मी खरात, आशा जाधव कुंभारी, सुनीता काळे, गोदावरी वाघ, उषा साप्ते, लता भालेराव, उषा चिमणे, लता शिरसाट, रुक्मिणी डोईफोडे, सुलोचना वायाळ, सावित्री चाटे, सुनीता कांबळे, संगीता वाहूळ, भारती कदम, स्वाती मरमट, नारायण खेड, बेबी सरकटे, उज्ज्वला देशमुख, प्रतिभा कदम, चित्रलेखा शेळके, मंगला वायाळ, पार्वती चव्हाण, मीना नागरे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Deposited to the office by inferior mobile Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.