लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अवैध धंद्यांवरील कारवाई बरोबरच पोलिसांनी रेकार्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कायदेशीर हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी शहरातून सात जणांना हद्दपार करण्यात आले.शहरात अवैध मटका व जुगार चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी फास आवळायला सुरुवात केली आहे. मटका अड्डा चालविण्याच्या गुन्ह्यात वारंवार सहभागी असणा-या ६५ जणांवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. पैकी २३ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ५५ अन्वये आणखी आठ जणांच्या हद्दपारीचे आदेश पारित केले.यामध्ये संजय रामचंद्र परिवाले (कडबीमंंडी) लहू जनार्दन राहटगावकर (माळीगल्ली) सय्यद युनूस सय्यद बशीर ( मंगळबाजार) सुनील लिंबाजी सोनटक्के (राजमहल टॉकीज) शाम रंगनाथ कवडे (ढोरपुरा) देवचंद चैनसिंग राजपूत (संग्रामनगर) शंकर आसाराम जाधव (नाथाबागल्ली) किसन मोहन तौर (बरवार गल्ली) यांचा समावेश आहे.
मटकाबहाद्दरांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:32 IST