एकावर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:23 IST2020-12-27T04:23:09+5:302020-12-27T04:23:09+5:30
बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानदेऊळगाव येथील दीपक डोंगरे याच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हिंसक कारवायांत ...

एकावर हद्दपारीची कारवाई
बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानदेऊळगाव येथील दीपक डोंगरे याच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हिंसक कारवायांत वाढ होत असल्याने बदनापूर पोलिसांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकरी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. बी. खेडकर यांनी हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावाच्या सुनावणीनंतर उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी डोंगरे याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले. हद्दपारीचे आदेश प्राप्त होताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोनि. खेडकर यांच्यासह सपोउपनि जारवाल, हवालदार बुनगे यांनी आदेशाची अंमलबजावणी केली. डोंगरे हा जिल्ह्यात आढळून आला तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.