अॅग्रोव्हिजन गटशेती संघाला कृषी विभागाची सर्वतोपरी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:18+5:302021-02-12T04:28:18+5:30
टेंभुर्णी : अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व ...

अॅग्रोव्हिजन गटशेती संघाला कृषी विभागाची सर्वतोपरी मदत
टेंभुर्णी : अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कृषी क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून, या गटशेती संघास तालुका कृषी विभाग सर्वतोपरी मार्गदर्शन व मदत करेल, असे आश्वासन जाफराबादचे तालुका कृषी अधिकारी शेराण पठाण यांनी दिले.
अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे नियमित मासिक चर्चासत्र जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथे मंगळवारी पार पडले. त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या गटशेती संघाने सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांना वळवून तालुक्यात फळबाग शेतीचे मोठे जाळे विणले, असेही ते म्हणाले. यावेळी चेअरमन भगवान डोंगरे यांनीही अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे कार्य मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. यावेळी अॅग्रोव्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे यांनी अॅग्रोव्हिजन गटशेती संघद्वारा स्वबळावर शाश्वत दिशादर्शक प्रायोगिक प्रकल्पअंतर्गत सीताफळ लागवड मॉडेलची रोपवन प्रक्रिया ते विक्री याबाबत सविस्तर माहिती सांगितली. यावेळी नंदकिशोर देशमुख, चंद्रकांत थोटे, पंढरीनाथ देठे, संदेश मोरे, अनिल जाधव, नितीन अंधारे यांनी आपापल्या गावात चालत असलेल्या गटशेतीची माहिती दिली. शिवार फेरीतूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक अरुण भदर्गे, डॉ. पी. व्ही. केदार, चेअरमन विष्णू गाडेकर, ज्ञानेश्वर थोटे, दत्तात्रय देठे, माधव वाघ, लक्ष्मण वाघ, गजानन डोईफोडे, सतीश डोईफोडे, आकाश डोईफोडे, सचिन डोईफोडे, जगदीश डोईफोडे, गणेश डोईफोडे, रामप्रसाद डोईफोडे, मदन डोईफोडे, विशाल सरोदे, अरुण डोईफोडे, राजेंद्र डोईफोडे, संदीप डोईफोडे, अशोक डोईफोडे, दिनकर डोईफोडे, मदन डोईफोडे, हरिदास डोईफोडे, सुभाष डोईफोडे, पिराजी बनकर, भानुदासराव डोईफोडे आदींची उपस्थिती होती.