शहरात डेंग्यू : अनेकजण तापाने फणफणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:34+5:302021-09-07T04:36:34+5:30
या चिकुन गुन्यामुळे गुडघ्यापासून खाली पाय पूर्णपणे गळून जात असून, काहींना कंबरेपासूनच हा त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील ...

शहरात डेंग्यू : अनेकजण तापाने फणफणले
या चिकुन गुन्यामुळे गुडघ्यापासून खाली पाय पूर्णपणे गळून जात असून, काहींना कंबरेपासूनच हा त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील नवीन आणि जुना जालना भागातील लहानमोठ्या रुग्णालयात या आजाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर येत असल्याची माहिती डॉ. राजेश सेठिया यांनी सांगितले, तर नूतन वसाहत, जुना जालना भागातील डॉ. दीपक देशमुख यांनीदेखील अशाच प्रकारचे रुग्ण गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये वाढल्याचे सांगितले.
चौकट
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : अंबेकर
शहरात झपाट्याने पसरत असलेल्या डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जालना पालिकेने धूर फवारणीसह स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या आजारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उकळून पिण्यावर नागरिकांनी भर देऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही अंबेकर यांनी या निवेदनात केले आहे.
चौकट
अंगावर दुखणे काढू नये : शेख
जालना शहर व परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. केवळ आपल्याला ॲडमिट व्हावे लागेल या भीतीने अनेकजण रुग्णालयात जाण्यास टाळत असल्याचे दिसून येते. परंतु नागरिकांनी स्वत:च्या आरोग्यासह समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपचाराला प्राधान्य देण्याचे अवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी केले आहे.