अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:31+5:302021-02-06T04:56:31+5:30
बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार अंबड : कोरोनाच्या काळात ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल येथील राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बजरंग सेनेच्या वतीने ...

अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी
बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार
अंबड : कोरोनाच्या काळात ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल येथील राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बजरंग सेनेच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पोनि. अनिरूध्द नांदेडकर, डॉ. भागवत कटारे, कल्याण जोशी, डॉ. यशवंत कुलकर्णी, शिवाजी बजाज, साध्वी धर्मसिंहनी, गायत्री दीदी, प्रमोद राऊत, किरण मुंडलिक, तेजस मंडलिक आदींची उपस्थिती होती.
मोकाट जनावरांमुळे ज्वारीचे मोठे नुकसान
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव शिवारातील शेतातील ज्वारीसह इतर पिकांचे मोकाट जनावरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. येथील शेतकरी रफीक अमिन कुरेशी यांच्या गट नंबर ४६२मधील शेतातील शाळू, ज्वारीचे पीक मोकाट जनावरांनी खाऊन साफ केले. यात कुरेशी यांचे मोठे नुकसान झाले असून, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दैठणा गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
घनसावंगी : तालुक्यातील दैठणा येथील आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना गटशेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडल अधिकारी साळवे, कृषी मंडल अधिकारी भोसले, संजय लोंढे, तलाठी शेख, ग्रामसेवक तोर, मुख्याध्यापक गायकवाड, अशोक खोजे, उपसरपंच बंडू बुलबुले, नवनाथ बुलबुले, किसन थेटे, अर्जुन थेटे, किरण पिंगळे, सुरेश बुलबुले आदींची उपस्थिती होती.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईलधारक त्रस्त
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकमेकांना संपर्क साधताना अडचणी येत असून, इंटरनेट सेवेवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. इंटरनेटअभावी शासकीय, निमशासकीय कामेही ठप्प होत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.