विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:29+5:302021-01-08T05:39:29+5:30
व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंठा : तालुका व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या हस्ते सत्कार ...

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी
व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
मंठा : तालुका व्यापारी महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब बोराडे, सतीश गोरे, पवन मणियार, ओमप्रकाश टाके, दत्तराव निर्वळ, विजय सराफ, अरूण वाघमारे, नीरज सोमानी, इलियास कुरेशी, जमीर कुरेशी आदींची उपस्थिती होती.
रामनगर येथील महिला मेळाव्यात मार्गदर्शन
जालना : तालुक्यातील रामनगर येथील क्रांतिसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व महिला आर्थिक उन्नती मंडळाच्या वतीने महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी तक्रार निवारण केंद्राच्या सपोनि राठोड, ॲड. सोपान शेजूळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच स्वाती शेजूळ, नाबार्डचे महाप्रबंधक तेजल क्षीरसागर, मनोहर सराेदे, गणेश गव्हाणे, विष्णू पिवळ, उषा शिंदे, अयोध्या टेमकर, संतोष थेटे व महिलांची उपस्थिती होती.
रवींद्र राठोड यांचा निवडीबद्दल सत्कार
घनसावंगी : गोर सेनेच्या जिल्हा सचिवपदी रवींद्र राठोड यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, प्रदेशाध्यक्ष संपत चव्हाण, विभागीय अध्यक्ष राजाभाऊ राठोड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीनंतर राठोड यांचा सत्कार करण्यात आला. राठोड यांच्या निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.