गारपिटीच्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:30 IST2021-03-05T04:30:17+5:302021-03-05T04:30:17+5:30
जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा ...

गारपिटीच्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी
जालना : जिल्ह्यात गत महिन्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. या गारपिटीचा जिल्ह्यातील ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून प्रशासनाकडे अहवाल सादर केला असून, झालेल्या नुकसानीपोटी प्रशासनाने ९३ लाख रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यात १८ फेब्रुवारी रोजी वादळीवाऱ्यासह गारपीट झाली होती. या गारपिटीचा सर्वाधिक फटका भोकरदन तालुक्यातील मालखेडा, ठालेवाडी, इब्राहिमपूर, भोकरदन, नांजा, सुभानपूर गावांना बसला होता. यात फळबागा व हरभरा, मका, गहू, कांदा सीड्सचे अतोनात नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश मिळाल्यानंतर महसूल, कृषी विभागाकडून संयुक्त पंचनामे केले. त्यानंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला. या अहवालात जिल्ह्यातील ६८८ शेतकऱ्यांच्या ८८ हेक्टवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले, तर ९४८ शेतकऱ्यांच्या ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले असल्याचे अवाहलात नमूद करण्यात आले आहे. यात कांदा सीड्स पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवाय वीज पडल्याने एकाचा मृत्यूही झाला होता. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ११ लाख ८८ हजार रुपयांची, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ८२ लाख पाच हजार ७०५ रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात गाटपिटीचा ८८ हेक्टरवरील पिकांना ३३ टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला आहे, तर ६०७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडे ९३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
-विजय माईनकर, कृषी उपसंचालक, जालना
===Photopath===
040321\04jan_3_04032021_15.jpg
===Caption===
भोकरदन