बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:32+5:302021-02-19T04:20:32+5:30
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ग्रामसुरक्षा दल व स्वयंसेवकांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम केले होते. या कामाबद्दल केंद्रप्रमुख ...

बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील ग्रामसुरक्षा दल व स्वयंसेवकांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम केले होते. या कामाबद्दल केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून कोरोनातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, मुंतीजर तांबोळी, किशोर टकले, प्रल्हाद जाधव, रमेश मगरे, पांडुरंग टकले, रामेश्वर टकले यांच्यासह युवकांची उपस्थिती होती.
सुखापुरी गावामध्ये कोरोनाबाबत जागृती
अंबड : तालुक्यातील सुखापुरी गावात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, श्रीरंगराव बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोनाबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोरोनातील सूचनांचे पालन, घ्यावयाची दक्षता, सामाजिक उपक्रमांची माहिती आदींबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सुखापुरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.