ऑस्किजनची मागणी तीनपट वाढली : झारखंड, मुबईतून पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST2021-03-25T04:28:15+5:302021-03-25T04:28:15+5:30
जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची मोठी संख्या असल्याने रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे. असे असले तरी हा ऑक्सिजनचा पुरवठा ...

ऑस्किजनची मागणी तीनपट वाढली : झारखंड, मुबईतून पुरवठा
जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन बेडची मोठी संख्या असल्याने रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे. असे असले तरी हा ऑक्सिजनचा पुरवठा करताना पुरवठादाराच्या नाकीनऊ येत आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर खुद्द जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत. जालन्यातील जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरातील कोविड रुग्णालयासाठी आणि अन्य एक असे ऑक्सिजनचा साठा करणारे दोन २० टनांचे प्लांट आहेत. असे एकाच ठिकाणी दोन ऑक्सिजनचे प्लांट खूप दूर्मीळ असल्याचे सांगण्यात येते. हे दोन प्लांट उभारताना सरासरी ५० लाख रुपयांचा खर्च प्रत्येकी आला असल्याचे नमूद करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयातील प्रत्येकी दहा बेड हे ऑक्सिजनची गरज पूर्ण करणारे असल्याचे सांगण्यात आले. जालना येथील जिल्हा रुग्णालयात गेल्यावर्षीच जवळपास प्रत्येक बेडला ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल या संदर्भातील पाईपलाईन करण्यात आलेली आहे. त्याचा आज मोठा लाभ रुग्णांना होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.
चौकट
सर्वांच्या साथीने दोन ऑक्सिजन प्लांट
जालना येथील कोविड सेंटरमधील ऑक्सिजनचा प्लांट उभारणीसाठी येथील बियाणे कंपनी महिकोने एसआरएस मधून ६० लाख रुपये दिले आहेत, तर दुसरा प्लांट हा शासकीय मदतीतून झाला आहे. त्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल यांची मोठी मदत झाली आहे, तर कोविड रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठीची प्रयोगशाळा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मदतीतून साकारली असल्याने मोठी मदत झाली आहे.
रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना
चौकट
तरुणांच्या स्थितीने मन हेलावतेय...
कोरोनाच्या थैमानाने जालना शहर ढवळून निघाले आहे. या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण हे कमी असले तरी ते चिंतेची बाब आहे. अनेक तरुणांना हा कोरोना आपल्या कवेत घेत असल्याने आपण एक व्यक्ती म्हणून व्यथित झालो असून, अनेक रुग्णांना चांगले उपचार मिळावेत म्हणून कायम शासकीय तसेच खासगी डॉक्टरांच्या संपर्कात राहून जास्तीत जास्त मदत करत आहोत; परंतु तरुणांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे आपण हेलावलो आहोत.
आ. कैलास गोरंट्याल, जालना