हायमस्ट लॅम्प बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:39+5:302021-02-05T08:03:39+5:30
कारवाईची मागणी जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खराब रस्ते आणि क्षमतेपेक्षा अधिक ...

हायमस्ट लॅम्प बसविण्याची मागणी
कारवाईची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खराब रस्ते आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची होणारी धोकादायक वाहतूक अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
‘मत्स्योदरी’ वाणिज्य वार्तापत्राचे प्रकाशन
अंबड : येथील मत्स्योदरी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाणिज्य वार्तापत्राचे प्राचार्य डॉ.शिवशंकर घुमरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा.चंद्रसेन कोठावळे, डॉ.मिलिंद पंडित, डॉ.विनोद जाधव, पांडुरंग गहिरे, सतीश गुजर, ज्ञानेश्वर बटुळे, विष्णू खांडेकर, पवन गिरी, स्वाती राठोड आदींची उपस्थिती होती.
विस्कळीत वीजपुरवठा; शेतकऱ्यांची गैरसोय
भोकरदन : ग्रामीण भागातील विशेषत: शेतीला केला जाणारा वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे रखडत आहेत, शिवाय पिकांना पाणी देतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तांत्रिक समस्या सोडवाव्यात, सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
विस्कळीत सेवेचा ग्राहकांना फटका
अंबड : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे मोबाइलवरून एकमेकांना संपर्क साधणे मुश्कील होत आहे, शिवाय इंटरनेट सेवाही पूर्णत: कोलमडली आहे. परिणामी, सर्वसामान्यांची विविध कामे रखडत आहेत. याकडे बीएसएनएलच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे.