महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:25 IST2021-01-04T04:25:30+5:302021-01-04T04:25:30+5:30
समता परिषदेच्या वतीने महिलांचा सत्कार भोकरदन : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय ...

महिलांसाठी स्वतंत्र न्यायालयाची मागणी
समता परिषदेच्या वतीने महिलांचा सत्कार
भोकरदन : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका गयाबाई जाधव, रेखा दारूंटे, समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षा वंदना शिंदे, ॲड. हर्षकुमार जाधव, राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
जालना : शहरातील दु:खीनगर व परिसरातील नाल्या ठिकठिकाणी तुंबल्या असून, रस्त्यावर कचराही दिसत आहे. अस्वच्छतेमुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
जालना : शासनाच्या मिशन बिगिन अंतर्गत जिल्ह्यात विविध नियम, सूचना लागू करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नियमित मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर वापर करणे गरजेचे आहे. शिवाय जिल्ह्यात लागू असलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.