निराधारांना वाढीव अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST2020-12-27T04:22:21+5:302020-12-27T04:22:21+5:30
रस्त्याची दुरवस्था भोकरदन : तालुक्यातील वज्रखेडा ते पिंपळगाव कोलते या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. चालकांना ...

निराधारांना वाढीव अनुदान देण्याची मागणी
रस्त्याची दुरवस्था
भोकरदन : तालुक्यातील वज्रखेडा ते पिंपळगाव कोलते या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे याचा सर्वाधिक त्रास या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील नदीवर पूल बांधून या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
डोणगाव गावात चोरी
अंबड : तालुक्यातील डोणगाव येथील आकाश वैद्य यांच्या घरी बुधवारी रात्री चोरी झाली. चोरट्यांनी वैद्य यांनी पँटच्या खिशात ठेवलेले रोख अडीच हजार रूपये चोरून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. या प्रकरणी आकाश वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार व्ही. एन. वाघमारे हे करीत आहेत. चोरीच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
कारवाईची मागणी
बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या दारू विक्री जोमात सुरू आहे. शहरी, ग्रामीण भागातील धाबे, हॉटेलमध्ये दारू विकली जात आहे. त्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, भांडण तंट्यात वाढ होत आहे. शिवाय महिलांनाही या तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब पाहता राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने दारू विक्रेत्यांविरूध्द कारवाई मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.