आव्हानाचा सिल्लोड तालुक्यात समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:39 IST2017-12-15T00:39:15+5:302017-12-15T00:39:38+5:30
भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात समावेश करण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

आव्हानाचा सिल्लोड तालुक्यात समावेश करा
लोकमत न्यूज नेटवर्क
आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात समावेश करण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी हात वर करून सिल्लोड तालुक्यात सहभागी होण्याला बहुमत दिले. त्यामुळे ग्रामसभेच्या कार्यवृत्तांतात, याबाबतचा ठराव घेण्याचे नमूद करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी बी.बी. सरवदे यांनी सांगितले.
सात हजारांवर लोकसंख्या असलेल्या आव्हाना ग्रामस्थांना व्यापार, आरोग्य आणि शिक्षणिक सुविधांसाठी सिल्लोड तालुका भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने गावाचा सिल्लोडमध्ये समावेश करावा, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. या मागणीसाठी यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सरपंच अनिता सरोदे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. कोरम पूर्ण झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला काही ग्रामस्थांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली.