मंत्री विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:42+5:302020-12-29T04:29:42+5:30
अंबड येथे संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली. पुढे ...

मंत्री विजय वडेट्टीवार यांची हकालपट्टी करण्याची मागणी
अंबड येथे संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी बैठक पार पडली. यावेळी ही मागणी करण्यात आली. पुढे बोलताना जेधे म्हणाले की, वडेट्टीवार हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ओबीसी आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रकार अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना कदापि सहन करणार नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष देवकर्ण वाघ, युवक जिल्हाध्यक्ष संदीप ताटगे, जिल्हा संपर्कप्रमुख विलास वाघमारे, उपजिल्हाप्रमुख शिवनाथ काळवणे, विलास कोल्हे, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन शिंदे, अंबड तालुकाध्यक्ष राधेशाम पवळ, जालना तालुकाध्यक्ष रमेश कव्हळे, नानासाहेब जोगदंड, ऋषीकेश देशमुख, भाऊराव मांगदरे, दत्ता चव्हाण, आकाश थेटे, तुळशीराम टाकसाळ, अनिल सावंत, धीरज जिगे, कृष्णा अडसूळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.