गाैतम बुद्धांचा पुतळा उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:27+5:302021-02-20T05:28:27+5:30
दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे अपघात ...

गाैतम बुद्धांचा पुतळा उभारण्याची मागणी
दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी
जालना : जालना-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. त्यामुळे अपघात प्रणव क्षेत्रातील अपघाताचा धोका वाढला आहे. सूचनाफलक, दिशादर्शक फलक नसल्याने चालकांची गैरसोय होत आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गत काही दिवसांपासून रस्ता अपघातात वाढ झाली आहे. शिवाय ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन गरजेनुसार दिशादर्शक फलक, सूचना फलक बसवावेत, अशी मागणी होत आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
भोकरदन : शहरासह ग्रामीण भागात दारूविक्री, गुटखा विक्री, जुगार आदी अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शिवाय महिलांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.