भत्ता देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:14+5:302021-02-12T04:28:14+5:30

विद्यार्थ्यांना मास्क वाटप जालना : तालुक्यातील पिंपरी फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विद्यार्थ्यांना ...

Demand of employees for payment of allowances | भत्ता देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

भत्ता देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांना मास्क वाटप

जालना : तालुक्यातील पिंपरी फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र बनकर, केंद्रप्रमुख मांटे, कोंडाबाई जाधव, मुख्याध्यापक किंगरे, निपाणीकर, मंडपे आदी उपस्थित होते.

व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर

धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब, जिल्हा सचिव प्रवीण मेहता, जगन्नाथ थोटे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन सर्वांच्या संमतीने धावडा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सय्यद निजामुद्दीन, सचिव कडुबा सपकाळ, उपाध्यक्ष मधुकर घोडकी, सहसचिव हेमराज मेहता यांची निवड करण्यात आली. हस्तीमल बंब यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी प्रकाश अनवेकर, पंजाब देशमुख, सय्यद गयासोद्दिन, अनिल अप्पा घोडतूरे, सुरेश देशमुख, विजय अनवेकर, तुकाराम सपकाळ, बिस्मिल्ला जमादार, चंद्रकांत विसपुते, संतोष घोडतुरे, शेख मोबीन, अमोल देशमुख, सुधाकर घोडकी, रहैमतुल्ला पठाण, शेख मतीन हे उपस्थिती होते.

जिल्हाधिकाऱ्यांची वालसावंगीत पाहणी

वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. त्यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांच्यासह कृषी विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी

जालना : शहरातील दोन चिमुकल्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस निधी देऊन खारीचा वाटा उचलला आहे. दरम्यान, बिल्होरे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मंगळवारी वेदश्री ईश्‍वर बिल्होरे व राजनंदनी नंदू बिल्होरे या दोन चिमुकल्यांनी घनशामदास गोयल यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी गोपाल गोयल हे उपस्थित होते.

तपोवन गोंधनचे गणेश गव्हले यांना पुरस्कार

जाफराबाद : तालुक्यातील तपोवन गोंधन येथील कवी तथा ग्रामीण कथाकार गणेश गव्हले यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ‘स्टोरी मिरर’ या वेबपेजद्वारे त्यांना “साहित्य कर्नल” या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. स्टोरी मिररचे संस्थापक दत्ता राऊत यांनी पत्राद्वारे कळविले आहे. गणेश गव्हले हे ललित कला साहित्य मंचचे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.

धनंजय ढाकणे याचे परीक्षेत यश

जालना : शहरातील धनंजय पंकज ढाकणे याने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या आईएलटीएस या पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

विविध मागण्यांचे निवेदन

जामखेड : दाढेगाव येथील तलाठी पोतदार यांच्या निष्काळजीपणामुळे फळबाग नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित राहिले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. या निवेदनावर मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे, अध्यक्ष उमेश गव्हाणे, राधेश्याम पवळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रेणुका विद्यालयात राठोड यांचा सत्कार

मंठा : आमदार राजेश राठोड यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर तसेच उच्च शिक्षण विकास आयोग आणि विद्यापीठ अधिसभेवर निवड झाल्याबद्दल येथील रेणुका विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डी. जी. शेळके उपमुख्याध्यापक सचिन राठोड, पर्यवेक्षक आर. के. राठोड, पी. एस. देशमुख, सुधाकर शिंदे, शरद बोराडे, ॲड. मधुकर मोरे, प्रकाश घुले, विजय राठोड, बाळासाहेब वांजोळकर, सुरेश वाव्हळे आदी उपस्थित होते.

स्कूलमध्ये हळदी- कुंकवाचा कार्यक्रम

कुंभार पिंपळगाव : येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या अध्यक्षा कीर्ती उढाण यांच्या वतीने महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिलांनी संगीत खुर्ची, उखाणे, भाषणासह इतर स्पर्धेत सहभाग घेतला. बक्षीस वितरण कीर्ती उढाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुसुम राजूरकर, रेखा कंटुले, मनीषा घुमरे, सीमा कंटुले, रुक्मिणी मापारी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Demand of employees for payment of allowances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.