भत्ता देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:15+5:302021-02-11T04:32:15+5:30
विद्यार्थ्यांना मास्क वाटप जालना : तालुक्यातील पिंपरी फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विद्यार्थ्यांना ...

भत्ता देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
विद्यार्थ्यांना मास्क वाटप
जालना : तालुक्यातील पिंपरी फाटा येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र बनकर, केंद्रप्रमुख मांटे, कोंडाबाई जाधव, मुख्याध्यापक किंगरे, निपाणीकर, मंडपे आदी उपस्थित होते.
व्यापारी महासंघाची कार्यकारिणी जाहीर
धावडा: भोकरदन तालुक्यातील धावडा येथे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हस्तीमल बंब, जिल्हा सचिव प्रवीण मेहता, जगन्नाथ थोटे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन सर्वांच्या संमतीने धावडा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी सय्यद निजामुद्दीन, सचिव कडुबा सपकाळ, उपाध्यक्ष मधुकर घोडकी, सहसचिव हेमराज मेहता यांची निवड करण्यात आली. हस्तीमल बंब यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रकाश अनवेकर, पंजाब देशमुख, सय्यद गयासोद्दीन, अनिल अप्पा घोडतुरे, सुरेश देशमुख, विजय अनवेकर, तुकाराम सपकाळ, बिस्मिल्ला जमादार, चंद्रकांत विसपुते, संतोष घोडतुरे, शेख मोबीन, अमोल देशमुख, सुधाकर घोडकी, रहैमतुल्ला पठाण, शेख मतीन उपस्थित होते.
मराठा बांधवांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा
अंबड : साष्टपिंपळगाव येथे एकविसाव्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. जालना, बीड, पुणेसह विविध जिल्ह्यांतून मराठा समाजबांधव येऊन या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मंठा येथील मराठा बांधवांनी रॅलीद्वारे आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे.
वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन
जालना : कोरोनाकाळातील वाढीव वीजबिले माफ करावीत आणि केंद्र शासनाने केलेली इंधन दरवाढ मागे घ्यावी, या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रा. सुदर्शन तारख, विजय वाढेकर, कैलास खांडेभराड, संदीप वाघमारे यांची उपस्थिती होती.
चिमुकल्यांकडून श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी
जालना : शहरातील दोन चिमुकल्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस निधी देऊन खारीचा वाटा उचलला आहे. बिल्होरे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मंगळवारी वेदश्री ईश्वर बिल्होरे व राजनंदनी नंदू बिल्होरे या दोन चिमुकल्यांनी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानचे अध्यक्ष घनशामदास गोयल यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी उद्योजक गोपाल गोयल, हिंदू महासभेचे ईश्वर बिल्होरे, अशोक बिल्होरे यांची उपस्थिती होती.
गणेश गव्हले यांना पुरस्कार
जाफराबाद : तालुक्यातील तपोवन गोंधन येथील कवी तथा ग्रामीण कथाकार गणेश गव्हले यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल ‘स्टोरी मिरर’ या वेबपेजद्वारे त्यांना “साहित्य कर्नल” या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. स्टोरी मिररचे संस्थापक दत्ता राऊत यांनी पत्राद्वारे कळविले आहे. गणेश गव्हले हे ललित कला साहित्य मंचचे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.
नाव्हा रोडवरील जंगलात आग ; गवत जळून नष्ट
जालना : जालना शहरालगत असलेल्या नाव्हा रोडवरील जंगलात मंगळवारी सकाळी अचानक आग लागल्याने शेकडो हेक्टरवरील गवत जळून नष्ट झाले. सकाळी हा वणवा पेटल्याने परिसरात सगळीकडे धूर व आगीचे लोट पसरले होते. अग्निशमन विभाग, सामाजिक वनीकरण आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. मोठ्या तत्परतेने ही आग विझविण्यात आली आहे.
आनंदनगर विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप
जालना : आनंदनगर येथे भारतीय बौध्द महासभा व इंडियन मानवाधिकार असोसिएशनकडून माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप व अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी अभिजित शेजवळ, राजेश सदावर्ते, महेंद्र बनकर, आशालता शेजवळ उपस्थित होते.
रेणुका विद्यालयात राठोड यांचा सत्कार
मंठा : आ. राजेश राठोड यांची महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यांवर तसेच उच्च शिक्षण विकास आयोग आणि विद्यापीठ अधिसभेवर निवड झाल्याबद्दल येथील रेणुका विद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डी.जी.शेळके उपमुख्याध्यापक सचिन राठोड, पर्यवेक्षक आर.के.राठोड, पी. एस. देशमुख, सुधाकर शिंदे, शरद बोराडे, ॲड. मधुकर मोरे, प्रकाश घुले, विजय राठोड, बाळासाहेब वांजोळकर, सुरेश वाव्हळे आदी उपस्थित होते.
स्कूलमध्ये हळदी- कुंकू कार्यक्रम
कुंभार पिंपळगाव : येथील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये शाळेच्या अध्यक्षा कीर्ती उढाण यांच्या वतीने महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदी- कुंकवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात महिलांनी संगीत खुर्ची, उखाणे, भाषणासह इतर स्पर्धांत सहभाग घेतला. बक्षीस वितरण कीर्ती उढाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुसुम राजूरकर, रेखा कंटुले, मनीषा घुमरे, सीमा कंटुले, रुक्मिणी मापारी आदींची उपस्थिती होती.