स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST2021-01-16T04:35:29+5:302021-01-16T04:35:29+5:30

पुलाचे काम संथगतीने जालना : नवीन व जुना जालना शहराला जोडणारा जुना पूल पाडण्यात आला आहे. तेथे सुरू असलेल्या ...

Demand for cleanliness | स्वच्छतेची मागणी

स्वच्छतेची मागणी

पुलाचे काम संथगतीने

जालना : नवीन व जुना जालना शहराला जोडणारा जुना पूल पाडण्यात आला आहे. तेथे सुरू असलेल्या नवीन पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. हे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.

युवकांचा सत्कार

जालना : भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, सिध्दीविनायक मुळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष सुनील खरे, गणेश वाघमारे, शाम जाधव, आकाश देशमाने आदींची उपस्थिती होती.

चालकांची कसरत

जालना : शहरातील बालाजी चौकातून नवीन माेंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. अपघाताचा धोका पाहता रस्त्याचे काम करण्याची मागणी होत आहे.

प्रवाशांची गैरसोय

जालना : येथील बसस्थानकात गुरूवारी रात्री पुणे मार्गावरील बससाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे अनेकांना तासभर थांबून दुसऱ्या बसने प्रवास करावा लागला.

Web Title: Demand for cleanliness