दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:43 IST2021-02-26T04:43:31+5:302021-02-26T04:43:31+5:30
जालना : शालेय शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हानिहाय ...

दिव्यांगांच्या प्रमाणपत्रासाठी शिबिर घेण्याची मागणी
जालना : शालेय शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हानिहाय शिबिर घ्यावे, अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव राजेंद्र पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्यात सर्व शिक्षा अभियानांतर्गत ६ वर्षांपूर्वी अपंग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हास्तरावर शिबिरांचे आयोजन केले जात होते. मात्र, गत ६ वर्षांपासून निधीअभावी अशी शिबिरे घेतली जात नाहीत. त्यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के अपंग विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातून प्रमाणपत्रासाठी शहरी भागामध्ये चकरा मारणे पालकांना शक्य होत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर यासाठी शिबिर आयोजित करून प्रमाणपत्रांचे वाटप करावे, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख संतोष राजगुरू, विकास घुगे, संजय बागडी, दत्तात्रय पुरी, श्रीकृष्णा बोदेले, प्रफुल्ला रामटेके, योगेश झांबरे, बी. आर. काळे, सचिन दांडगे आदी उपस्थित होते.