अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:17+5:302021-02-11T04:32:17+5:30
कलापथकाद्वारे काेरोना जनजागृती बदनापूर : शासनाच्यावतीने कोरोनाचा धोका आणि दक्षता याबाबत जनजागृती करण्यासाठी कलापथके नियुक्त करण्यात आली आहेत. तालुक्यातील ...

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी
कलापथकाद्वारे काेरोना जनजागृती
बदनापूर : शासनाच्यावतीने कोरोनाचा धोका आणि दक्षता याबाबत जनजागृती करण्यासाठी कलापथके नियुक्त करण्यात आली आहेत. तालुक्यातील गावागावात लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
हस्तपोखरी-कर्जत रस्ता दुरुस्तीची मागणी
अंबड : तालुक्यातील हस्तपोखरी ते कर्जत या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती सुरू करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी, ग्रामस्थांमधून केली जात आहे.
गरजू नागरिकांना ब्लँकेट, धान्य वाटप
जालना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, स्टुडंट ऑफ सेवा अंतर्गत समस्त महाजन यांच्यावतीने शहरातील गरजूंना ब्लँकेट, धान्य कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी अभाविपचे शहर सहमंत्री समाधान कुबेर, जिल्हा संयोजक श्रेया चंदन, अनिकेत शेळके, शहरप्रमुख योगेश बिडवे, धीरज गुप्ता, अक्षय शेलार, रितिक दिलपे, वसीम खान, शुभम कोल्हे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
भोकरदन : तालुक्यातील पळसखेडत्त मुर्तड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख पुंडलिक सोनुने यांच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी किरण सोनुने, मुख्याध्यापक आर्यन इंगळे, पुंडलिक सोनुने, परसराम सोनुने, कौतिक सोनुने, कृष्णा सोनुने, आदित्य सोनुने यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
जालना : शहरातील विविध भागात होणारी वाहतूक कोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या महामार्गासह शहरांतर्गत बाजारपेठेतही ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवून वाहतूक कोंडी सोडविणे गरजेचे आहे.
बदनापुरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती
बदनापूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बदनापूर येथे आयोजित कार्यक्रमात वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक एस. एम. झाडबुके यांनी मार्गदर्शन केले. वाढणारे अपघात आणि चालकांनी वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता याची माहिती झाडबुके यांनी दिली. यावेळी वाहन चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
२२ फेब्रुवारीपासून सैन्य भरतीचे आयोजन
जालना : सिग्नल कौर ट्रेनिंग सेंटर जबलपूर येथे युनिट हेडक्वार्टर कोट्यातून सेवारत सैनिकांचे पाल्य व सख्खे भाऊ, माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांसाठी सोल्जर टेक्निकल, सोल्जर जी डी ट्रेडसमॅन पदासाठी २२ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत सैन्य भरती होत आहे. तरी लाभार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांनी केले आहे.
मठपिंपळगाव मार्गावर अपघाताची मालिका
अंबड : तालुक्यातील मठपिंपळगाव गावातून मुख्य मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. परंतु, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईड पंखे भरलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघात सतत होत आहेत. एखादी घटना घडण्यापूर्वी या मार्गावरील दोन्ही बाजूंचे साईड पंखे भरून घ्यावेत, अशी मागणी वाहन चालकांसह ग्रामस्थ करीत आहेत.
सेवानिवृत्तीनिमित्त पाचपोळ यांचा सत्कार
परतूर : शहरातील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विज्ञान विभागाचे प्रा. अशोक पाचपोळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. सदाशिव मुळे, सीताराम काकडे, सुधाकर जाधव, डॉ. रवी प्रधान, प्रा. संभाजी तिडके, शंकर पवार आदींची उपस्थिती होती.