अमळनेरात लादलेला बंद हाणून पाडण्याचा व्यापारी संघटनांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:30 IST2021-01-10T22:28:41+5:302021-01-10T22:30:18+5:30

लादलेला बंद हाणून पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.

Decision to strike down Amalner | अमळनेरात लादलेला बंद हाणून पाडण्याचा व्यापारी संघटनांचा निर्णय

अमळनेरात लादलेला बंद हाणून पाडण्याचा व्यापारी संघटनांचा निर्णय


अमळनेर : पुढील सोमवार पासून अमळनेरकरांवर लादलेला बंदला विविध 19 व्यापारी संघटनांनी हाणून पाडण्याचा निर्णय सुजाण कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरात मोजक्या व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतून शहर बंद चे प्रयोग लादले जात आहेत अमळनेर व्यापारी महासंघाने यास आधीपासून विरोध दर्शविला होता. कोरोनामुळे गेले सात आठ महिने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन त्यावेळी करण्यात आले होते. शासन जर आठ महिन्यांची नुकसान भरपाई करून देत असेल तर निश्चित आठवड्यातून एक दिवस बंद पाळू अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. सुजाण मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत कापड रेडिमेड असोसिएशनचे जेठमल जैन रमेश जीवनांनी , पूनम कोचर किराणा व्यापारी झामनदास सैनानी, हॉटेल व्यवसायिक मनीष जोशी , हार्डवेअर असोसिएशनचे तसेच ग्राहक मंचाचे प्रतिनिधी मकसूद बोहरी , सोनार सराफ असोसिएशन चे मुकुंद विसपुते , सिमेंट बिल्डिंग मटेरियल चे श्याम गोकलानी , फोटोग्राफर संघटना , इलेक्टरीक संघटनांचे रोहित बठेजा , ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट संघटनेचे अजय केले , मोबाईल विक्रेते प्रकाश जाग्यानी , बेकरी अँड फूड्स , फुटवेयर विक्रेते , पानठेला असोसिएशन , भाजी मार्केट व्यापारी , अडत व्यापारी , किरकोळ विक्रेते , भुपेंद्र जैन , बापू हिंदुजा, अशोक हिंदुजा आदी या बैठकीस हजर होते 11 रोजी चा सोमवार बंद जाहीर झाला असल्याने तो पाळण्यात यावा मात्र यापुढील सोमवारी बंद पाळणार नाहीत असा ठाम निश्चय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Decision to strike down Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.