ट्रॅक्टरने पेट घेतल्याने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:37 IST2017-12-16T00:37:13+5:302017-12-16T00:37:31+5:30
भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरने पेट घेतल्याने २२ वर्षीय युवकाचा जळून मृत्यू झाला.

ट्रॅक्टरने पेट घेतल्याने युवकाचा मृत्यू
जाफराबाद : भरधाव ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरने पेट घेतल्याने २२ वर्षीय युवकाचा जळून मृत्यू झाला. तालुक्यातील भारजशिंदी रस्त्यावर गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली.
जुबरेखाँ अजीरखाँ पठाण (रा.बोरगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तो ट्रक्टर (एमएच २१,एएन १६३८) घेऊन बोरगावकडे येत होता. भारजी शिंदी रस्त्यावर वेगात असलेला ट्रॅक्टर अचानक उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरच्या समोरील भागातील टाकीने पेट घेतला. चालक जुबेर पठाण टाकीखाली दबला गेल्याने त्याचा आगीत जळून मृत्यू झाला. तसेच ट्रॅक्टरचेही नुकसान झाले. समीर इमामखाँ पठाण यांनी घटनेची माहिती जाफराबाद पोलिसांना दिली. या प्ररकणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक एन.टी. पाटील तपास करीत आहेत.