शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

जालन्यात जमावाने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 1:01 AM

जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला.

ठळक मुद्देलोहार मोहल्ला येथील घटना : सदर बाजार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल, मृत्यूच्या बातमीने शहरात काही काळ तणाव

जालना : जुन्या वादातून जालना येथील लोहार मोहल्ला परिसरात रविवारी रात्री १७ वर्षीय तरुणाला जमावाने बेदाम मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता, उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला. रोहित नारायण जाधव (१७) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरुन सोमवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात २० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी आठ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सोमवारी लोहार मोहल्ला परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणात दोन महिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली.याप्रकरणी मजीद, अजीज, मोसीन, बशीर खान फतरी खान, इम्रान खान बशीर खान, तोफीक बब्बू, सलीम शेख रहीम, खय्युम, शेख यूनूस शेख महेबूब, महेबुब शेख युसूफ, शेख रियाज शेख जिलानी, शेख सलीम शेख रहीम, शेख रसूल शेख यूनुस, शेख रहीम शेख रईस, शेख अलीम शेख रईस, शेख मासूम शेख करीम, चार महिला (सर्व रा. लोहार मोहल्ला) यांच्याविरोध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जालना शहरातील बसस्थानक परिसरातील लोहार मोहल्ल्यात ६ जून रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या घटनेमुळे त्या परिसरात तणावाची परिस्थीती होती. या परिसरात पोलीस बंदोबस्तही लावला होता. संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यामुळे सोन्या जाधव हा त्याच्या कुटूंबियांसह त्या ठिकाणाहून फरार झाला होता. याच दिवशी या परिसरातील जमावाने त्याचे घर पाडून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चाळीस जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी घराची पाहणी करण्यासाठी आलेल्या सोन्या जाधव यास जमावाने पाहिले. नदीच्या परिसरात त्यास घेराव घालून जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात नेले असता उपचारादरम्यान रविवारी रात्री सोन्या जाधवची प्राणज्योत मालवली. चार दिवसांपासून जुन्या वादामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.याप्रकरणी संगीता नारायण जाधव (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुुळे जिल्हा रुग्णालयासह लोहार मोहल्ला परिसरात तणावपूर्ण परिस्थीती निर्माण झाली होती. या या वादानंतर लोहार मोहल्ल्यात सदर बाजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे यशवंत जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.पोलिसांचे दुर्लक्ष : बंदोबस्ताही घटनागेल्या आठवडाभरापासून लोहार मोहल्ला परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वादातून मोठा वाद उफाळला होता. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. असे असतांना जमावाने एकत्र येऊन १७ वर्ष वयाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या बंदोबस्ता बदल सोमवारी दिवसभर शहरात चर्चा होती.तीन दिवसांपूर्वीच विक्की जाधव याचे कुटुंब आणि लोहार मोहल्यातील रहिवाश्यांमध्ये तुफान वाद झाला होता. यावेळी रहिवाशी जमावाने आक्रमक होऊन तान्या जाधव आणि त्याच्या काही नातेवाईकांची घरे पाडली होती. यावेळी जाधव याच्या पूर्ण कुटुंबाने पलायन केले होते.याप्रकरणी जमावाविरुद्ध पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेख मासुम यांच्या फिर्यादीवरून तान्या जाधव, रोहित जाधव, आकाश जाधव या तीन सख्ख्या भावासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :JalanaजालनाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी