वडिलांच्या तेराव्याहून परतताना मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:31 IST2017-11-19T23:31:23+5:302017-11-19T23:31:31+5:30
भोकरदन तालुक्यातील मनापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

वडिलांच्या तेराव्याहून परतताना मुलाचा मृत्यू
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील मनापूर फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. मृत युवक वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रम आटोपून परत जात असतानाच ही घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
संजय दयानंद कांबळे (४०, रा. वाडी खु,) असे मृताचे नाव आहे. तर एकनाथ पांडुरंग सुसर ( ३२, रा.मलकापूर) सिदार्थ रायबान पारखे (५५ रा. वाडी खु) अशी जखमींची नावे आहेत. मयत संजय कांबळे हे सोलापूर येथे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तेराव्याच्या विधीसाठी ते गावी वाडी खु. येथे आले होते. गावाकडील सर्व विधी आटोपून सोलापूरला जाण्यासाठी दुचाकीवरून परत जात असताना, मनापूर फाट्याजवळ समोरून येणा-या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी शेख यांनी जखमींवर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी दोघांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णयालयात दाखल करण्यात आले.