शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:48 IST

अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवाराला लगतच असलेल्या दयाळा शिवारात रविवारी सकाळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली

लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर :  अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवाराला लगतच असलेल्या दयाळा शिवारात रविवारी सकाळी एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. गोंदी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. बळीराम दत्तात्रय तुपे (रा.कोळघर ता. औरंगाबाद) असे मयताचे नाव आहे. घात की अपघात, याबाबत गोंदी पोलिसांनी शोध सुरु ेकेला आहे.शेतकरी महादेव गारूळे यांना त्यांच्या गट क्रमांक पाच मध्ये कोणीतरी अनोळखी व्यक्ती पडलेली आढळून आली. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीवरुन तात्काळ गोंदी पोलिसांनी दयाळा शिवार गाठत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व मृतदेहाच्या अंगावरील पॅन्टमध्ये आधारकार्ड व शेजारी असलेल्या रस्त्यालगतच लाल रंगाची दुचाकी क्रमांक एम.एच. २० सी.एफ़ ४६८४ उभी असल्याने त्याची शहानिशा केली असताना शेतामध्ये पडलेल्या इसमाची ओळख पटली. बळीराम दत्तात्रय तुपे असे नाव आधारकार्डवर दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सूत्रांनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच सदर इसम मयत झालेला असावा व विष प्राशन केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. गोंदी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री येथे हलवला. पोलिसांनी नातेवाईकांना माहिती दिली. उत्तरीय तपासणी करून डॉक्टर काय अहवाल देतात तसेच कुटुंबिय व नातेवाईकांकडे विचारपुस करून घातपात किंवा आत्महत्येबाबत गोंदी पोलीस पुढील तपासाची दिशा ठरवणार आहेत.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहाय्यक फौजदार सय्यद नसीर पो.का.योगेश दाभाडे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अशाच प्रकारे गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारे मृतदेह आढळण्याची ही दुसरी घटना आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या केली का कोणी त्याला विषारी द्रव पाजले, या दिशेने तपास करण्यात येत असल्याची माहिती गोंदी पोलिसांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस