खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:08 IST2018-02-10T00:08:13+5:302018-02-10T00:08:18+5:30
परतूर तालुक्यातील दैठणा शिवारात वरफळ येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना एका ३८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे .

खोदकाम सुरू असलेल्या विहिरीत मृतदेह
आष्टी : परतूर तालुक्यातील दैठणा शिवारात वरफळ येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना एका ३८ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे .
पोलिसांनी सूत्रांनी सांगितले, की वरफळ येथील शेख मुनीर शेख नूर यांचा मृतदेह रामभाऊ भदर्गे यांच्या गट क्रमांक ३६ मधील शेतात खोदकाम सुरु असलेल्या विहिरीमध्ये शुक्रवारी सकाळी आढळून आला.या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा प्रकार घातपात आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतदेहाचे श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर नेमकी परिस्थिती स्पष्ट होेईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिली .