हातपाय बांधून मृतदेह फेकला गोदावरी पात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:34 IST2018-03-04T01:34:24+5:302018-03-04T01:34:36+5:30
परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून हातपाय बांधून मृतदेह दगडाच्या साह्याने गोदावरी नदीत फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
_201707279.jpg)
हातपाय बांधून मृतदेह फेकला गोदावरी पात्रात
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : परतूर तालुक्यातील गंगासावंगी येथे अनोळखी व्यक्तीचा खून करून हातपाय बांधून मृतदेह दगडाच्या साह्याने गोदावरी नदीत फेकून दिला. शनिवारी सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला.
गंगासावंगी शिवारातील आष्टी-माजलगाव रस्त्यावरील पुलाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, जमादार अनंत नागरगोजे, गोपीनाथ कांदे हे कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहोचले. गोदावरी पात्रात साधारणत: चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा तरंगत असलेला मृतदेह पोलिसांनी गावकºयांच्या मदतीने पाण्याबाहेर काढला. मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाºयांना घटनास्थळी बोलवून घेऊन जागेवरच शवविच्छेदन केले. मृतदेहावर गावकºयांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक माहिती देताना सपोनि इज्जपवार यांनी सांगितले की, मृत व्यक्तीचा कुठेतरी दुसºया ठिकाणी गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयितांनी सुताच्या दोरीच्या साह्याने मृतदेहाचे हातपाय बांधून त्यास दगडाच्या साह्याने नदीत फेकले असावे. मृत व्यक्तीच्या अंगावर अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट असून, याबाबत कोणाला माहिती असल्यास आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा. या प्रकरणी जमादार अनंत नागरगोजे यांच्या फियार्दी वरून आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि विनोद इज्जपवार करत आहेत.