धोकादायक डिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:31 IST2021-01-19T04:31:58+5:302021-01-19T04:31:58+5:30
कारवाईची मागणी घनसावंगी : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक ...

धोकादायक डिपी
कारवाईची मागणी
घनसावंगी : शहरासह परिसरात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाढलेले रस्ता अपघात पाहता चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरूच
अंबड : शहरासह परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. खंडित वीजपुरठ्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या भागात सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
रस्त्याची दुरवस्था
परतूर : शहरांतर्गत भागातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधितांनी शहरांतर्गत रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कचऱ्याचा ढिगारा
जालना : शहरातील भाग्यनगर व परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून, या भागातील कचरा नियमित उचलावा, अशी मागणी होत आहे.