धोकादायक डीपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:24 IST2021-01-09T04:24:56+5:302021-01-09T04:24:56+5:30
बाजारात गर्दी वाढली बदनापूर : मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सणानिमित्त लागणारे साहित्य ...

धोकादायक डीपी
बाजारात गर्दी वाढली
बदनापूर : मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. सणानिमित्त लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला, मुलींची लगबग सुरू असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे.
अवैध प्रवासी वाहतूक
मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अनेक चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. तालुक्यातील वाढते अपघात पाहता अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
अपघाताचा धोका
अंबड : शहरातील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बेशिस्त चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पथदिवे दिवसाही सुरूच
जालना : शहरातील विविध भागांतील पथदिवे दिवसाही सुरूच राहत आहेत. पथदिव्यांच्या ॲटो ऑन- ऑफ स्वीचचे काम रखडले आहे. त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.