जामखेड मंडळात दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:30 IST2021-09-11T04:30:14+5:302021-09-11T04:30:14+5:30

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माजी आमदार संतोष सांबरे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी गुरुवारी ...

Damage to crops on ten thousand hectares in Jamkhed Mandal | जामखेड मंडळात दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जामखेड मंडळात दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माजी आमदार संतोष सांबरे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी गुरुवारी पाहणी केली.

जामखेड मंडळात मंगळवारी सायंकाळी अडीच तास झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मंडळात तब्बल १६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जामखेड मंडळातील २१ गावांतील ११ हजार पाचशे शेतकऱ्यांचे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची माजी आमदार संतोष सांबरे यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, मंडळ अधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी बाळू सानप, ग्रामविकास अधिकारी एम. मिसाळ, कृषी सहायक अमोल गाडेकर, शिवाजी तार्डे, संदीप धुळे, नारायण कणसे, तुळशीराम मंडलिक, गणेश मोहिते, विजय जाधव, आबासाहेब इंगळे, गणपत भोजने आदींची उपस्थिती होती.

Web Title: Damage to crops on ten thousand hectares in Jamkhed Mandal