द्राक्षाची दीडशे झाडे कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:24 IST2017-12-12T00:24:13+5:302017-12-12T00:24:18+5:30

तालुक्यातील शिंगोना येथील एका शेतक-याच्या द्राक्षबागेतील दीडशे झाडे अज्ञात इसमांनी कापूस टाकली.

Cut one and a half trees of grape | द्राक्षाची दीडशे झाडे कापली

द्राक्षाची दीडशे झाडे कापली

परतूर : तालुक्यातील शिंगोना येथील एका शेतक-याच्या द्राक्षबागेतील दीडशे झाडे अज्ञात इसमांनी कापूस टाकली. त्यामुळे शेतक-याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सोमवारी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंगोना येथील शेतकरी कैलाश सुजनराव मुळे यांनी द्राक्षबागेची लागवड केलेली आहे. सुरुवातीपासूनच ते द्राक्षबागेची काळजी घेत आहेत. रविवारी रात्री अज्ञातांनी द्राक्षबागेतील दीडशे झाडे कापून टाकली. द्राक्षवेलींना आता द्राक्ष लागायला सुरुवात झाली होती. मात्र खोडसाळपणे कुणी तरी द्राक्षाची झाडे तोडून टाकल्याने मुळे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मुळे यांंच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cut one and a half trees of grape