वाकुळणी बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:00+5:302021-02-05T08:06:00+5:30
पोषण आहार कामगारांचा तालुकास्तरीय मेळावा घनसावंगी : तालुक्यातील पोषण आहार कामगारांचा घनसावंगी येथे तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ...

वाकुळणी बस बंद
पोषण आहार कामगारांचा तालुकास्तरीय मेळावा
घनसावंगी : तालुक्यातील पोषण आहार कामगारांचा घनसावंगी येथे तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मधुकर मोकळे, ॲड. अनिल मिसाळ यांनी मार्गदर्शन केले. पोषण आहार कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी लढा उभारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मेळाव्यास तालुक्यातील कामगारांची उपस्थिती होती.
आन्वा, वाकडीच्या प्रकल्पातून पाणी उपसा
आन्वा : गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने आन्वा, वाकडी येथील प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता. त्यामुळे भविष्यातील पाण्याचा प्रश्नही मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले जात होते. परंतु, गत तीन महिन्यांत या दोन्ही प्रकल्पांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. सध्या अनेकजण अनधिकृत पाणीउपसा करीत आहेत. ही परिस्थिती पाहता पाणी उपशाचे नियोजन करणे गरजेचे आहे.