दीड लाख रुपयांचे क्रेशर मशीन चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:19+5:302021-02-26T04:44:19+5:30
कोकाटे हादगाव येथे घरफोडी जालना : घराचा दरवाजा उघडून कपाटातील रोख रक्कम ८६ हजार ५०० रुपये व सोन्या, चांदीचे ...

दीड लाख रुपयांचे क्रेशर मशीन चोरीस
कोकाटे हादगाव येथे घरफोडी
जालना : घराचा दरवाजा उघडून कपाटातील रोख रक्कम ८६ हजार ५०० रुपये व सोन्या, चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना परतूर तालुक्यातील आष्टी येथे १७ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी लालूबाई राठोड यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रकाश सोपान चव्हाण (रा. कोकाटे हादगाव ता. परतूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ. चव्हाण हे करीत आहेत.
रस्त्यावर दुचाकी उभा करणाऱ्यावर गुन्हा
जालना : परतूर येथील गणेश रसाळ (वय ३५) यांनी माऊली टी हाऊसजवळ रस्त्यावरच दुचाकी उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केला. याप्रकरणी संतोष हावळे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हावळे हे करीत आहे.