पूजेचे साहित्य खरेदीसाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:20 IST2019-10-27T00:20:20+5:302019-10-27T00:20:31+5:30
प्रसाद म्हणून लाह्या, बत्तासे, साखरफुटाणे, यासह लक्ष्मीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडा-फडी तसेच ऊसाची मोठी मागणी दिसून आली.

पूजेचे साहित्य खरेदीसाठी उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवाळी सणातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन हा होय. रविवारी सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रसाद म्हणून लाह्या, बत्तासे, साखरफुटाणे, यासह लक्ष्मीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडा-फडी तसेच ऊसाची मोठी मागणी दिसून आली.
शनिवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यांवर दुकाने थाटून बसलेल्या पणती, बोळके इ. साहित्याची पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले. झेंडूची फुले देखील यावेळी पावसाच्या फटक्याने कोमेजली होती. या पावसाचा फटका ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. त्याचप्रमाणे फूलशेती करणा-या शेतक-यांना बसला आहे. दिवाळीनिमित्त महाग मिळणारी फुले यावेळी कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. काही ठिकाणी तर झेंडूची फुले विक्री न झाल्याने रस्त्यावर फेकून दिल्याचे पहावयास मिळाले.