आधार नोंदणीसाठी डाक कार्यालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:25 IST2021-01-14T04:25:57+5:302021-01-14T04:25:57+5:30
जालना : विविध योजनांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणा-या आधार कार्डसाठी नोंदणी करणे तसेच आधार नोंदणी अद्ययावत करणे यासाठी मुख्य डाकघरात ...

आधार नोंदणीसाठी डाक कार्यालयात गर्दी
जालना : विविध योजनांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणा-या आधार कार्डसाठी नोंदणी करणे तसेच आधार नोंदणी अद्ययावत करणे यासाठी मुख्य डाकघरात नागरिकांची गर्दी दिसून येते. तर राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ही सुविधा असून, येथे सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरातील मुख्य डाकघर येथे दैनंदिन ३० ते ४० नागरिकांची आधार नोंदणी, अपडेशनचे काम केले जात आहे. नागरिकांनी एकाच वेळी गर्दी करू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे, आवाहन पोस्टमास्टर जी. आर. पारीपेल्ली यांनी केले आहे. आधार नोंदणी आधार अद्ययावत करणे यापूर्वी ग्राहक सेवा केंद्राकडे ही केले जात होती. आता राष्ट्रीयीकृत बँक तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये ज्यांचे खाते आहेत त्यांना आधार अपडेट अथवा नव्याने नोंदणी करायला सांगितले जाते. आधार नोंदणीसाठी वेगळा कर्मचारी वर्ग हा राष्ट्रीयीकृत बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये स्वतंत्र असणे गरजेचे आहे. जुन्याच कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
सूचनांचे पालन करावे
नागरिकांची सोय व्हावी, यासाठी पोस्ट कार्यालयामार्फत आधार नोंदणी, अपडेशनची सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांनीही सूचनांचे पालन करून या योजनेचा लाभ घ्यावा, इतर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्टमास्टर जी. आर. पारीपेल्ली हे करीत आहेत.