आष्टी परिसरातील बॅंकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:31 IST2021-05-20T04:31:56+5:302021-05-20T04:31:56+5:30
रस्त्यावर खड्डे जालना : जालना शहरातील मंमादेवी ते रेल्व स्थानक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने ...

आष्टी परिसरातील बॅंकेसमोर गर्दी
रस्त्यावर खड्डे
जालना : जालना शहरातील मंमादेवी ते रेल्व स्थानक रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खते, बियाण्यांवरील दरवाढ मागे घ्यावी
अंबड : रासायनिक खताच्या किमती तत्काळ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार बी.के. चंडोल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे बाबासाहेब इंगळे, विनायक चोथे, शहरप्रमुख कुमार रूपवते, दिनेश काकडे, विजयकुमार सोमाणी, राम लांडे आदी उपस्थित होते.
वाळू चोरीचा प्रयत्न करणारे अटकेत
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी परिसरातील गोदापात्रातून वाळूचोरी करण्यासाठी एकत्र आलेल्या चार जणांना पोलिसांनी मंगळवारी पकडले आहे. त्यांच्यावर गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोंदी परिसरातील गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने पात्रातून आता अवैध वाळू उपशाला सुरवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाहनधारकांकडून दंड वसूल
शहागड : जालना-बीडच्या जिल्हा चेक पोस्टवर बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून ३ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. ट्रिपल सिट वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे, विनामास्क आदी कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. यावेळी सचिन साळवी, होमगार्ड वराडे, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश सिनगारे, गणेश खोसे, अजीम शेख आदींची उपस्थिती होती.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणाऱ्या ११ जणांवर कारवाई करण्यात आली. पारध पोलीस व ग्रामपंचायतच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी पडोळ, भुतेकर, ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, भागवत बोराडे आदींची उपस्थिती होती.
लस उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ परतले माघारी
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील केंद्रावर माहिती अभावी ग्रामस्थांना अनेकदा कोरोना प्रतिबंधक लसी विना परतावे लागत आहे. आष्टीसह परिसरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणासाठी ग्रामस्थ सरसावले आहे. मात्र, आष्टी येथील केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना माघारी परतावे लागत आहे.
खतांची दरवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन
बदनापूर : रासायनिक खतांची दरवाढ तत्काळ रद्द करा अन्यथा मनसेच्या वतीने शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते यांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या निवेदनावर गिते, तालुकाध्यक्ष विष्णू शिंदे, कृष्णा खलसे, शहराध्यक्ष बाळू जाधव, संजय जऱ्हाड, गणेश शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सतीश अग्रवाल यांचा सत्कार
बदनापूर : जालन्यातील प्रसिद्ध उद्योजक व पोलाद स्टील कंपनीचे अध्यक्ष सतीश अग्रवाल यांच्या पुढाकाराने शासकीय व खासगी रूग्णालयात दररोज २५० ऑक्सिजन सिलिंडरचे मोफत वाटप केले जात आहे. या उपक्रमासाठी पोलाद स्टील कंपनीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यानिमित्त माजी आमदार संतोष सांबरे यांच्या हस्ते सतीश अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलादचे संचालक विशाल अग्रवाल, भरत सांबरे,अरूण पेरे आदींची उपस्थिती होती.
विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी
परतूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले असतानाही अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. यावेळी सपोनि. राजेंद्र ठाकरे, गोपनीय शाखेचे सुनील वैद्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक तारे, डॉ. पायल माने, अनुराधा पवार, पांडुरंग मोगल आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.
गोंदी- वडीगोद्री रस्त्याची दुरवस्था
वडीगोद्री : येथील गोंदी-पाथरवाला खुर्द- वडीगोद्री रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बाभळीची काटेरी झाडे वाढल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. गोंदी ते वडीगोद्री हा मार्ग वडीगोद्री येथे येण्यासाठी सुमारे दहा ते बारा गावांच्या सोयीचा आहे. मात्र या रस्त्याची मागील दोन वर्षांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठाले खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळी आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी
परतूर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावले असतानाही अनेक जण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांसह आरोग्य विभागाच्या पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. यावेळी सपोनि. राजेंद्र ठाकरे, गोपनीय शाखेचे सुनील वैद्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक तारे, डॉ. पायल माने, अनुराधा पवार, पांडुरंग मोगल आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.