लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना-राजूर रस्त्यावरील पीरपिंपळगाव व तुपेवाडीजवळ मंगळवारी दुपारी दोन बसवर दगडफेकीची घटना घडली. या प्रकरणी पाच संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी राजूकरडे अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास जालना-राजूर बस प्रवाशांना घेवून राजूरकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी बससच्या समोरील काचारवर दगडफेक करून बसचे दहा हजारांचे नुकसान केले. जालना-राजूर रस्त्यावरीलच पीरपिंपळगाव येथे पावणेपाच वाजेच्या सुमारास तीन युवकांनी अन्य एका बसवर दगडफेक केली. यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती. या प्रकरणी बसचालक रामकिसन काटे व राजेंद्र ढोणे यांच्या फिर्यादीवरून संशयितांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक पठाण व पोलीस नाईक मतकर तपास करीत आहेत.
पीरपिंपळगाव व तुपेवाडीजवळ दोन बसवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:36 IST