क्रॉसबो : जालन्याच्या संजना जयस्वालचा सुवर्णवेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST2021-07-15T04:21:48+5:302021-07-15T04:21:48+5:30

संजनाने याआधी देखील रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. क्रॉसबो हा क्रीडा प्रकार म्हणजे धनुर्विद्येच्याच ...

Crossbow: Jalna's Sanjana Jaiswal's gold medal | क्रॉसबो : जालन्याच्या संजना जयस्वालचा सुवर्णवेध

क्रॉसबो : जालन्याच्या संजना जयस्वालचा सुवर्णवेध

संजनाने याआधी देखील रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. क्रॉसबो हा क्रीडा प्रकार म्हणजे धनुर्विद्येच्याच प्रकारात मोडणारा क्रीडा प्रकार आहे. परंतु तीर आणि कामठी नसून तो अत्याधुनिक धनुष्यबाण म्हणून ओळखला जातो. या क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या असून, या स्पर्धेत हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. याआधी रशियामध्ये २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षात संजनाने क्रॉसबो क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

येथील जेईएस महाविद्यालयातील प्रशिक्षक शर्मा यांनी तिला मार्गदर्शन केले असून, राज्यपातळीवरील क्रॉसबो असोसिएशनची देखील मोठी मदत आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी झाल्याचे संजनाने नमूद केले. कोरोनाच्या दीड वर्षानंतर मैदानावर उतरल्याचे तिने सांगितले. या दीड वर्षात आपण जालन्यातील जेइृएस महाविद्यालयात प्रॅक्टिस केल्याचे संजनाने सांगितले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जालन्यातील श्री ओम स्टील तसेच पोलाद स्टील यांनी मला मदत केल्याचेही संजनाने नमूद केले.

Web Title: Crossbow: Jalna's Sanjana Jaiswal's gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.