पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:47+5:302021-02-05T08:06:47+5:30

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन जालना : शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात ...

Crop damage | पिकांचे नुकसान

पिकांचे नुकसान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

जालना : शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप देशपांडे, संतोष दाणी, भगवानराव पुराणिक, शिवाजी जोशी, मुकुंद कुलकर्णी, मधुकर वैद्य, जगदीश गौड, डॉ.संजय रुईखेडकर, सतीशचंद्र प्रभू आदींची उपस्थिती होती.

आंदोलनात शिवबा संघटनेचा सहभाग

वडीगोद्री : मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत, शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश शिंदे, तालुकाध्यक्ष सचिन घाडगे, तालुका सचिव शिवाजी काळे, ॲड.दत्तात्रय लिखे, गजानन महाराज, सतीश जगताप, दिव्या पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

शहरातील सिमेंट रस्त्याच्या कामास प्रारंभ

जालना : शहरातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये करण्यात येणाऱ्या सिमेंट रस्ता कामास नगरसेवक श्रावण भुरेवाल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकास कामे केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास शांतिलाल परिहार, शिंदे, शेख कादिर, शेख समीर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Crop damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.