जालन्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचे संकट अधिक गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:25+5:302021-04-08T04:30:25+5:30

एकूणच कोरोनाचे जे रुग्ण कमी गंभीर आहेत, अशांसाठी फेबीफ्लू टॅबलेटस् दिल्या जातात. त्यांचाही पूर्वीएवढा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात ...

The crisis of shortage of remedesivir injection in Jalna is even darker | जालन्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचे संकट अधिक गडद

जालन्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचे संकट अधिक गडद

एकूणच कोरोनाचे जे रुग्ण कमी गंभीर आहेत, अशांसाठी फेबीफ्लू टॅबलेटस् दिल्या जातात. त्यांचाही पूर्वीएवढा पुरवठा होत नसल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील जवळपास २० खासगी आणि जिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा वापर केला जातो. मध्यंतरी कोरोना रुग्ण कमी झाल्याने या औषधांची मागणी कमी झाली होती. त्यामुळे हे इंजेक्शन काही ठिकाणी फेकून देण्याची वेळ आली होती. आज नेमकी याच्या उलट स्थिती निर्माण झाली आहे.

एकूणच या इंजेक्शनचे रुग्णांना पहिल्यादिवशी २०० एमएलचा डोस दिला जातो. नंतर हाच डोस कमी करून तो १०० एमएल केला जातो. अशी सहा इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे विषाणूविरुध्द लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवित असल्याचे सांगण्यात आले.

चौकट

काळाबाजार रोखण्यासाठी एक्सपायरी डेट घटविली

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन सरकारने उत्पादक कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची एक्सपायरी डेट ही तीन महिनेच टाकावी, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु मध्यंतरी कोरोनाची रुग्ण संख्या घटली होती. त्यामुळे नंतर ही एक्सपायरी डेट वाढवून ती एक वर्ष करण्यात आली आहे.

व्हेंटिलेटर वाढविण्याची गरज

कोरोना रुग्णांना लागणारा ऑक्सिजन जालन्यात सध्या उपलब्ध आहे. परंतु हा ऑक्सिजन योग्यदाबाने रुग्णांना देण्यासाठी लागणाऱ्या व्हेंटिलेटरचाही तुटवडा जाणवत आहे. सध्या जालन्यातील कोविड रुग्णालयात ८० व्हेंटिलेटर आहेत. ते पूर्ण क्षेमतेने भरलेले आहेत. त्यामुळे नवीन रुग्ण भरती करताना अनेक अडचणी येत आहेत. जालन्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेने खूप चांगली अवस्था आहे. हे व्हेंटिलेटर वाढवून मिळावेत म्हणून आमचे प्रयत्न आहेत.

Web Title: The crisis of shortage of remedesivir injection in Jalna is even darker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.