मोसंबी उत्पादकांवर फळ गळती पाठोपाठ मोठ्या डासांचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:21+5:302021-08-19T04:33:21+5:30
चौकट आता वैयक्तिक जीआय मानांकन महत्त्वाचे जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादन हे दर्जेदार असून, त्याला एकवेगळी अशी विशिष्ट चव आहे. ...

मोसंबी उत्पादकांवर फळ गळती पाठोपाठ मोठ्या डासांचे संकट
चौकट
आता वैयक्तिक जीआय मानांकन महत्त्वाचे
जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादन हे दर्जेदार असून, त्याला एकवेगळी अशी विशिष्ट चव आहे. यासाठी मध्यंतरी मोठा पाठपुरावा होऊन जालना जिल्ह्यातील मोसंबीला जीआय अर्थात भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. परंतु हे मानांकन प्रत्येक मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी त्यांनी सीट्रेस या ऑनलाईन नोंदणी केंद्रावर स्वत:ची सविस्तर माहिती देणे बंधनकारक आहे. असे केल्यास त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी पुढकार घेण्याची गरज आहे.
पांडुरंग डोंगरे, ज्येष्ठ मोसंबी उत्पादक शेतकरी, कर्जत
चौकट
मोसंबीवर डासांचे संकट घोंगावणार
फळगळतीच्या संकटानंतर आता मोसंबी उत्पादकांसमोर मोठ्या डसांचे संकट घोंगावत आहे. दरम्यान, सध्या मोसंबीच्या बागांमध्ये दहा ते पंधरा डास नजरेस पडत आहेत, परंतु त्यांची उत्पती ही झपाट्याने होते. एक डास झाडांवरील पाच ते सात फळांना डंख मारून त्यातील रस शोषून घेतो. त्यामुळे या डासांसाठी इलेक्ट्रीक ट्रॅप महत्त्वाची भूमिका निभावतो. किंवा बागांध्ये धूर केल्यास त्याचाही परिणाम डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल असे जाणकार शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.