संस्था चालकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:11+5:302021-02-26T04:44:11+5:30
शिक्षिकेच्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर व तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी काकासाहेब मुरकुटे यांनी ...

संस्था चालकावरील अत्याचाराचा गुन्हा अखेर रद्द
शिक्षिकेच्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर व तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी काकासाहेब मुरकुटे यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे त्यांच्यावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी ॲड . प्रशांत आर. नांगरे यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेच्या सुनावणी दरम्यान तक्रारदार शिक्षिकेने तिला आरोपीविरूद्ध कोणताही न्यायालयात पुरावा सादर करावयाचा नाही, असे शपथपत्र दाखल केले. तसेच सुनावणी दरम्यान, तक्रारदार शिक्षिकेच्या तपासी अधिकारी यांच्यापुढे जबाब नोंदविण्यात आला. या सर्व बाबी विचारात घेऊन तसेच दोषारोपपत्रातील सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी काकासाहेब मुरकुटे यांच्यावर दाखल असलेला फौजदारी गुन्हा दाव्याचा खर्च २५ हजार रुपये दंड आकारुन रद्द केला असल्याची माहिती ॲड. प्रशांत आर. नांगरे यांनी दिली आहे.
मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता. परंतु, गैरसमज झाल्याने माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि मला नाहक बदनामी सहन करावी लागली. मात्र, शेवटी मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मला न्याय देऊन सत्याचा बाजूने निकाल दिला आहे. माझ्या शाळेतील पालकांनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
काकासाहेब मुरकुटे, संस्थाचालक छत्रपती पब्लिक स्कूल, केदारखेडा.